Menu

श्रावण स्वर धारा हा श्रावण व पाऊस या विषयावर आधारीत गाण्याचा कार्यक्रम

दिनांक ०८/९/२०१८ शनिवार सायं.४ः३० वाजता श्रावण स्वर धारा हा श्रावण व पाऊस या विषयावर आधारीत गाण्याचा कार्यक्रम व्यास संगीत विद्यालयात यशस्वीपणे सादर करण्यात आला.


या कार्यक्रमात साधारणतः ७० विद्यार्थ्यांनी गाणे उत्साहाने सादर केले.सर्वच वयोगटातील या नवोदित कलाकारांचा उत्साह कौतुकास्पद होता.आपल्या भुतकाळातील पावसाचे सुंदर गोड अनुभव आपल्या गीतातून सर्वांनी सादर केले.


येरे येरे पावसा रुसलास का अशी बालमनाची केविलवाणी साद!ए आई मला पावसात जाऊ दे.. हा बालहट्ट….


येरे घना येरे घना न्हाऊ घाल माझ्या मना अशी तरुणीची आळवणी…निशाणा तुला जमला ना..असे पावसातील तरुण तरुणींच्या मनाला भुरळ घालणारे गीत..


भारती सृष्टीचे गीत गाणारे अनेक पावसाळे अनुभवलेल्या विद्यार्थी मनाच्या गायिकांनी आज मनमुराद आनंद लुटला.(७० विद्यार्थ्यांची नावे देणे येथे शक्य नाही)विद्यार्थ्यांच्या पालकांनीही आपला आनंद व्यक्त केला.


कु.झेबा हिने श्रावण स्वर धारा या नावाला शोभिवंत असे काढलेले चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.


श्री.विलास सरांनी शास्त्रीय व उपशास्त्रीय अशी सांगड घालून उत्तम गायन सादर करुन कार्यक्रमावर कळस चढवला.विद्यार्थ्यांना सरांचे गायन ऐकून समाधान वाटले.


श्री.किरण पांचाळ याने सनईचा सूर हे श्री गणरायाचे गाणे सादर करुन श्रावण महिन्यास निरोप देत भाद्रपद महिन्याचे स्वागत केले.आणि या कार्यक्रमाची सांगता केली.


या कार्यक्रमास पं.श्री.विद्याधर व्यास सर,श्री.सुभाष व्यास सर,श्री.कुलकर्णी सर व सौ.सुगंधा बोरगांवकर या मान्यवरांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोलाचे सहकार्य लाभले.

श्री.शानबाग सर

श्री.विलास सर

सौ.शलाका मॅडम

सौ.स्वराली मॅडम

श्री.गोविंद सर

आणि खान सर या सर्व शिक्षकांचे या कार्यक्रमात योगदान होते.

कु.शर्मिला

कु.सचिन

कु.क्षितीज

कु.रेशम

यांनीही मदतीसाठी हातभार लावला.


निवेदनःकु.दर्शना गडमुळे व श्री.किरण पांचाळ


साऊंड नियोजन

श्री.विक्रांत यादव

प्रसाद गावंड

श्री.सुनिल भोसले.

सिंथेसाइझर:

कु.ऋत्विक तांबे

हँडसोनिक साइड रिदम

श्री.नंदकुमार रेडीज

हार्मोनिअम

श्री.संदीप वालावलकर,

श्री.अशोक मेस्त्री

तबला संगतः

कु.श्रीधर भंडगे

कु.श्रेयस मोंडकर

कु.अमेय गाढवे.(बालकलाकार).

Dear Students,

          Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.

For further information, kindly contact :

Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)

Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)

Okay