Menu

स्वर्ग धरेचे उजळीत अंतर भूवरी अवतरते दिवाळी तेजे लखलखते

अशा या मंगलमय दिवाळीचं संगीतमय स्वागत करण्यासाठी ‘संगीत दीपोत्सव’ हा कार्यक्रम दिनांक ०४/११/२०२३ या दिवशी संध्याकाळी व्यास संगीत विद्यालयाच्या दादर येथील वास्तूत विद्यार्थी, शिक्षक आणि श्रोते यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात पार पडला.

श्री. कुलकर्णी सरांच्या हस्ते प्रतिकात्मक दीपप्रज्वलन झाल्यावर कार्यक्रमाची औपचारिक सुरवात झाली. तबला पेटीच्या सहाय्याने श्रोत्यांसमोर गायची अमूल्य संधी मिळत असल्याने अशा कार्यक्रमांना विद्यार्थ्यांचा नेहमीच उदंड प्रतिसाद मिळतो. तसा तो या कार्यक्रमास देखील मिळाला. हिंदी – मराठीतील विविध भावगीते, भक्तीगीते, चित्रपटगीते असा भरगच्च सांगितिक नजराणा विद्यार्थ्यांनी हर्ष उल्हासाने सादर केला. साईड रिधम तसेच तबला आणि हार्मोनियमची साथसंगत आपल्याच क्लासचे विद्यार्थी आणि शिक्षक आलटूनपालटून करत होते. त्याला विद्यार्थ्यांनीच हाताळलेल्या साऊंड सिस्टीमची खणखणीत जोड मिळाल्याने कार्यक्रम अधिक उठावदार आणि श्रवणीय झाला.

कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीची सामानाची मांडामांड, स्टेज तयार करणे, कार्यक्रमासाठी मुद्दामहून तयार करून घेतलेला फलक लावणे, रोषणाई, साऊंड सिस्टीम आणि कार्यक्रम संपल्यानंतरची आवराआवर ही सगळी कामे प्रत्येकवेळी आपल्या क्लासचेच विद्यार्थी मोठ्या आवडीने आणि जबाबदारीने करतात, म्हणूनच हे संगीताचे कार्यक्रम विद्यार्थी नियोजित आणि विद्यार्थ्यांसाठी आयोजित असतात असे म्हणायला हरकत नाही. त्यास समस्त शिक्षकांचे अतिशय मोलाचे आणि प्रोत्साहनपर मार्गदर्शन लाभते, त्यामुळे हे कार्यक्रम नेहमीच देखणे होतात. दिनांक ०४ नोव्हेंबर रोजी पार पडलेला ‘संगीत दीपोत्सव’ हा कार्यक्रम सुद्धा त्याला अपवाद नव्हता. कार्यक्रमात शेवटपर्यंत टिकलेली श्रोत्यांची उपस्थिती आणि प्रत्येक सादरीकरणाला मिळणारी त्यांची वाहवा ही या संगीत जलश्याच्या यशस्वीतेची पोचपावतीच होती.

हा नेटका आणि आखिव रेखिव कार्यक्रम ऐकण्यासाठी व्यास संगीत विद्यालयाचे विश्वस्त आणि संचालक पंडित विद्याधर व्यास जातीने उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संगीतविषयक बहुमूल्य मार्गदर्शन केले.

एकंदरीत ‘संगीत दीपोत्सव’ हा कार्यक्रम नेहमीप्रमाणेच खूप श्रवणीय आणि अविस्मरणीय झाला.

कार्यक्रमास सहाय्य करणारे विद्यार्थी –

सुनिल भोसले

किरण पांचाळ

सुरेश धोपटे

सचिन गावडे

विक्रांत यादव

अमोल शिंदे

कैवल्य रायकर

सिद्धेश पोफळे

गिरीश घैसास

मनाली जाधव

दर्शना गडमुळे

लेखनःश्री.गिरीश घैसास

Dear Students,

          Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.

For further information, kindly contact :

Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)

Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)

Okay