Menu

सौरभ कानूळकर

सर्वप्रथम दिनांक २९ सप्टेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या “तबला कार्यशाळेत” सहभागी करून घेतल्याबद्दल माझे गुरुवर्य श्री. अरुण कुंदेकर यांचे मनापासून आभार. तसेच आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आमच्या गुरूंचे गुरु श्री. मिलन देव सरांचे पण खूप खूप आभार.
कार्यशाळेची सुरुवात सरांनी चर्चासत्राने केली व सर्वांच्या रियाजनिगडीत समस्या जाणून घेतल्या व त्यावर उत्तम असे प्रबोधनपर मार्गदर्शन केले.
त्यानंतर सरांनी विविध बोल व बोलसमुह देऊन प्रत्येक विद्यार्थी कडून ते बोल रियाज करून घेतले व रियाज कसा करावा व आपले वादन आणखी कसे खुलवावे, याचा नवीन दृष्टिकोन दिला. सरांनी खूप काही असे मार्गदर्शन केले पण ते सर्व इथे शब्दात मांडणे कठीण आहे.
देव सरांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी मी अमलात आणण्याचा प्रयत्न करीन तसेच त्याप्रमाणे डोळस रियाज करण्याचा प्रयत्न करीन.
शेवटी इतकंच सांगेन की ही कार्यशाळा माझ्या तबला करिअर मधली “टर्निंग पॉइंट” ठरलेली असून असे खूप सारे “टर्निंग पॉइंट” येतील अशी इच्छा व्यक्त करतो.
पुन्हा एकदा माझे गुरुवर्य श्री. अरुण कुंदेकर यांनी “तबला कार्यशाळा” यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आम्हाला अशा अनेक कार्यशाळेत सहभागी व्हायला आवडेल. खूप काही शिकायला मिळालं व पुढेही मिळेल…

Dear Students,

          Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.

For further information, kindly contact :

Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)

Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)

Okay