Menu

Shri Ravikiran Bhagwan Kharatmal

माझे नाव रविकिरण भगवान खरटमल आहे.माझ्या घरी पुर्वीपासूनच संगीतमय वातावरण होते.माझे वडील उत्तम बासरी व अर्डीयन वादक होते.वडील जेव्हा जुनी गाणी वाजवत तेव्हा मी त्यांना ढोलकीवर साथ करायचो,त्यामुळे माझ्या मनात संगीत कलेबद्दल आदर,प्रेम,व आवड निर्माण झाली.माझी आवड पाहून मी शिकत असलेल्या विकास हायस्कूलमध्ये सुरु असलेल्या मटकर संगीत विद्यालयात मला तबला शिकण्यास पाठवले.श्री.मोहन गुरव सरांचे उत्कृष्ट मार्गदर्शन मला लाभले.प्रारंभिक परीक्षा उत्तीर्ण झालो आणि शिकण्याची आवड वाढली.मध्यमा प्रथम शिक्षण या विद्यालयात पूर्ण झाल्यानंतर वडीलांनी २७/६/२००७ या दिवशी दादर येथील व्यास संगीत विद्यालयात मला तबला शिकण्यास पाठवले.तिथे श्री.अरुण कुंदेकर सरांची भेट झाली.मध्यमा पूर्ण हे महत्त्वाचे वर्ष व्यास संगीत विद्यालयात शिकणे मला जमेल की नाही अशी शंका मनात निर्माण झाली पण व्यास संगीत विद्यालयात मन रमायला वेळ लागला नाही.ही वास्तूच मुळात संगीताने भारावलेली आहे असे जाणवले.इथले संस्थाचालक,शिक्षक व विद्यार्थी सहकारी सर्वच संगीतप्रेमी होते असे दिसले आणि पूर्वीच इथे आलो असतो तर बरे झाले असते असे वाटू लागले.
तबला शास्त्र व क्रियात्मक तबला या दोन्ही बाजूने मी सक्षम होऊ लागलो.व्यास संगीत विद्यालयात श्री.अरुण कुंदेकर सरांची शिकवण्याची पद्धत म्हणजे उदाहरणे देऊन स्थुल बुद्धीच्या विद्यार्थ्यांसही समजेल एवढे सोपे करुन सांगणे.त्यामुळे आम्हाला त्यांचा सहवास हवाहवासा वाटत असे.२००७ ते २०१६ पर्यंत मी व्यास संगीत विद्यालयात शिकलो,२०१६ साली मी तबला विशारद पूर्ण पदवीधर झालो.आजही व्यास संगीत विद्यालयात गेलो तरी तिथले संस्थाचालक,शिक्षक व विद्यार्थी माझे प्रेमाने स्वागत करतात.मी या विद्यालयाचा आणि इथल्या गुरुजनांचा सदैव ऋणी आहे.

Dear Students,

          Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.

For further information, kindly contact :

Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)

Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)

Okay